ब्रेकिंग

राज्यात वीकेण्ड लॉकडाऊन, तर उर्वरित दिवसांसाठी निर्बंध कडक

 

राज्यात वीकेण्ड लॉकडाऊन, तर उर्वरित दिवसांसाठी निर्बंध कडक

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्य सरकारने आता निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाची रविवारी दुपारी अत्यंत तातडीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सरसकट लॉकडाऊन लावता न लावता वीकेण्ड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे.

शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. तर उर्वरित दिवसांमध्ये देखील निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के क्षमतेने सुरू राहील असा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रिक्षा, खासगी वाहतूक यांच्यावर बंदी घालण्यात आलेली नाही, अशीही माहिती देण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित व्यवहार बंद राहतील.

वीकेण्ड व्यतिरिक्त उर्वरित दिवसांसाठी नाईट कर्फ्यू लावला जाणार आहे. तर दिवसा जमावबंदी लागू असेल. मॉल्स, थिएटर, बार  बंद ठेवले जातील. तर हॉटेल्समधून फक्त पार्सल सुविधा सुरू राहणार आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे