आपल खान्देशब्रेकिंग

जन्मदात्या मुलाचा आई वाडीलांच्या डोळ्यासमोर विहिरीत बुडून मृत्यू…

जन्मदात्यासमोरच पोट पोटचागोळा विहिरीत बुडाला, शर्थीचे प्रयत्न असफल..

झूम मराठी ओनलाईन न्यूज मीडिया

पाचोरा (झूम मराठी) मुलगा विहिरीत तळफडत होता; आई वडील त्याला वाचवण्यासाठी आकांत करत होती. पण नियतीनं डाव साधलाच, पाचोरा तालुक्यातील जामनेर रोड वरील आर्वे फाटा येथे अंतुर्ली शेतशिवारात काम करणाऱ्या आई बाबानां तहान लागल्याने त्यांचा मुलागा विहिरीतुन पाणी आणायला गेला खरा पण तो काही वेळ आलाच नाही त्यांना विहिरीत पडल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी आई वडिलांनी शर्थीचे प्रयत्न केले पण वाचवण्याचे आई वडिलांचे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू झाला.

पाचोरा तालुक्यातील जामनेर रोड वरील आर्वे फाटा येथे अंतुर्ली शेतशिवारात डॉक्टर संघवी यांचे शेत आहे. ते सोमवारी सकाळी पती पत्नी व मुलांसह सकाळपासून शेतात कामासाठी गेले होते. शेतात काम करत असतांना वना मोतीराम समाधान उर्फ बाळू वना पाटील, अमोल वना पाटील, आई प्रतिभा वना पाटील (रा.अंतुर्ली नं.१ आरवे) काम करतांना तहान लागल्याने आई-वडिलांनी मुलगा समाधान (वय २३) यास शेजारील बोहरी यांच्या शेतातील विहीरी वरुन पाणी घेऊन येण्याचे सांगितले. समाधान हा पाणी आणायला गेला, पाणी काढत असतांना तोल गेल्याने तो विहिरित पडला बाजूला काम करत असलेले वडील व भाऊ यांना विहिरित काही तरी पडल्याचा आवाज आल्याबरोबर त्यांनी विहीरीकड़े धाव घेतली त्यांनी पाहिले की मुलगा विहिरित पडल्याचे पाहिल्यावर त्यांनी लगेच विहिरित दोर टाकला परंतु समाधानला दोर पकडण्यात अपयश आले. एकीकडे मुलगा जीव वाचवण्यासाठी मृत्यूशी झुंजत होता तर दुसरीकडे जन्मदाता पिता आपल्या जवान मुलाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.

वडील कयवया करत होते. बचावासाठी आजूबाजूला कोणाचीच वेळेवर मदत न मिळाल्याने अखेरीस समाधान बुड़ुन तो तळाशी गेला. घटनेची वार्ता आरवे, लोहारी गावात पसरली आणि गावकरी डॉक्टर संघवी यांच्या शेताकड़े धाव घेतली. आरवे येथील एका तड़वी बांधवाने तळाशी बुडालेल्या मुलाला वर काढले. त्याला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तो मृत असल्याचे घोषित केले. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे