आपल खान्देश

पाचोरा प्रभाग क्र 1च्या काँक्रेट रस्त्याची दुरवस्था; घाणीचे साम्राज्य..

दिलीप जय परदेशी

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा नगरपालेकतील  प्रभाग क्रमांक एकमधून मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर मिळत असतो. त्यामानाने या भागाला नागरी सुविधांचा वाणवा दिसून येतो.  घण- कचऱ्याचां ढीग, काँक्रेट रस्त्यांवरील खड्डे, गटारींच्या समस्या अद्यापही कायम आहेत. वारंवार तक्रार करूनही पाचोरा पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, साठी नंदूभाऊ शेलार युवामंच(NS,Group)सरसावले असून पाचोरा नगरपालिका प्रसासनास निवेदन देऊन आंदोलन करणार असे सांगितले.

पाचोरा शहर नगरपालिका प्रभाग क्र.परीसरातील विवेकानंद नगर, पाटील नगर, थेपडे नगर, भवानी नगर, हनुमान वाडी शिंदे शाळा, मोंजिनिस शॉप भडगाव रोड च्या मागे वृंदावन पार्क, गोकुल धाम येथील भागात परिसरात ठीक – ठिकाणी कचराचे ढीग जमा झाले आहेत. मात्र या दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.  अनेक भागात घराच्या दारासमोर गटारी असल्याने डास, चिलटे तसेच दुर्गधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. कचऱ्याबरोबरच घंटागाडीचीही समस्या आहे. संपूर्ण प्रभागात एकच घंटागाडी येत असल्याने काही भागात तर घंटागाडी पोहोचतही नाही. यासाठी नंदूभाऊ शेलार युवामंच (NS, Group) सरसावले असून पाचोरा नगरपालिका प्रसासनास निवेदन देऊन आपली पुढील भूमिका ठरवणार आहॆत.

तसेच परिसरातील काँक्रेट रस्त्याच काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असुन रस्त्यावर खड्डे पडले आहेत.  भागातील रस्त्यांची अतिशय निकृष्ट दर्जाची कामे झाली असुन रस्त्यावर खड्डे पडले आहेत रस्त्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे परीसरातील लोकांना रस्त्यात खड्डे की खडड्यात रस्ते प्रश्न पडला आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या व वाहनधारक, वयोवृद्ध तसेच गर्भवती महिलांना याचा त्रास होत असल्याने आम्ही पालिकेला डंकेकिचोटवर प्रश्न विचारणार आहोत असे नंदू शेलार यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे