गुन्हेगारीमहाराष्ट्र

पोलिसाने केला अल्पवयीन युवतीचा विनयभंग; पोलीस तडकाफडकी निलंबित

कल्याण | येथील डोंबिवली  रामनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी सतीश कार्ले याने एका अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सतीश कार्ले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांनतर कार्लेला कोर्टासमोर उभं केलं असता कोर्टाकडून कार्ले याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच, विनयभंग प्रकरणी त्याला सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. सदरची कारवाई पोलिस उपायुक्तांनी केली आहे

याबाबत आधी माहिती अशी, डोंबिवली  येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीने तिचा विनयभंग पोलिस सतीश कार्ले याने केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. तरुणी इमारतीचा जिना चढत असताना तिच्या विनयभंग सतीश कार्ले याने केल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सतीश कार्लेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल (FIR) केला आहे. मुख्यतः म्हणजे ज्या पोलिस ठाण्यामध्ये सतीश कार्ले कार्यरत होता. त्याच पोलिस ठाण्यात कार्ले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे