आपल खान्देश

म्हसावद येथील तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनीवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली बाळू महाजन (वय-२०) रा. म्हसावद ता. जि.जळगाव ही तरूणी आईवडीलांसह राहते. वडील खासगी वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २७ मार्च रोजी घरात कोणीही नसतांना सोनाली महाजन हीने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आला. नेमके आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. २७ मार्च रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे