पाचोऱ्यात मोकाट जनावरांच्या हल्ल्यात 65 वर्षीय आजोबा गंभीर जखमी!
मोकाट जनावरांच्याविरोधातील मोहिमेचे वाजले तीन तेरा?
दिलीप जय परदेशी.
पाचोरा (झूम मराठी) पाचोरा शहरातील रस्त्यावर भटक्या गुरांची झुंडीचीं झुंज लागते. हे काय नवीन नाही! पण आज भाजी मंडी परिसरात एका 65 वर्षीय आजोबांवर भटक्या गुरांनी अचानक केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहॆ. याला जबाबदार पालिका प्रशासनच आहॆ. शहरातील मोकाट जनावरांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहॆ का? कि मोकाट जनावरांच्या विरोधात यत्रानाच नाही?
आज सकाळी जुलाल भोई (65) काही कामानिमित्ताने भाजी मंडीत समोरील रोडवरून जात असतांना एका मोकाट जनावरांच्या झुंडीतील जनावराने आजोबांना जोरदार धडक दिल्याने आजोबाच्या पोटात शिंग घुसल्याने ते रक्त भंबाळ झाले होते त्यांना तात्काळ उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतातरी पालिका प्रशासन जागे होईल का? असा प्रश्न निर्माण झालाय!
यापूर्वी झूम मराठीने या जनावरांच्या वावरा विषयी वृत्त व चलचित्र प्रसारित करून जागे केले होते, तेव्हा पाचोरा पालिका प्रशासनाने झोपेचे सोंग घेत कानात बोळे व डोळ्यावर पट्टी बांधली होती, पाचोरा नगरपालिकेकडून मोकाट जनावरांच्या विरोधात त्वरित ठोस कारवाई का होत नाही? पालिकेकडून मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कुठलीही मोहीम राबविली जात नसल्याचे पहावयास मिळत आहे. विकासाच्या प्रगतीकडे झेपावणाऱ्या शहरात सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे झाली आहेत. परंतु, रस्त्यावरच मोकाट जनावरे उभी राहत असल्याने पादचा-यांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मोकाट जनावरांच्याविरोधातील मोहिमेचे वाजले तीन तेरा?
यापूर्वी अनेक वेळा मोकाट जनावरांच्याविरोधात मोहिम राबवली गेली. इतकेच नाही तर मोकाट जनावरे ठेवण्यासाठी कोंडवाडे स्थापन करून त्यात मोकाट जनावरांना ठेवण्यात आले. मात्र आता या योजनेचे तीन तेरा वाजले असून आता शहरातील मोकाट जनावरांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहॆ. त्यामुळे अनेक वेळा पाचोरा शहरांत वाहतूक कोंडीची समस्या मोकाट जनावरांमुळे निर्माण होत आहे. पाचोरा नगरपालिकेकडून मोकाट जनावरांच्या विरोधात त्वरित ठोस कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे .



