नांदगाव,(प्रतिनिधी,) मुक्ताराम बागुल- नांदगाव तालुक्यात के.जी.एन. चॅरिटेबल चे संस्थापक व जिल्हा मुस्लीम उत्कर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मा. नगरसेवक सादिक भाई पठाण यांच्या विशेष प्रयत्नाने व नगरसेवक अमजद भाई पठाण समाजसेवक आजाद भाई पठाण
यांच्या पुढाकाराने गरीब व होतकरू बिल्डींग कामगारांना सुरक्षा किट प्रदान करण्यात आले. बिल्डींग कामगार हे भारुड गट व मनमाड येथील असून विशेष म्हणजे हे कीट महिलांनादेखील वितरित करण्यात आले आहे. हा उपक्रम 2017 पासून राबविण्यात येत आहे आणि विशेष करून महिलांना प्राधान्य देऊन अजूनही वेगवेगळे योजना राबवून तळाच्या घटकांपर्यंत पोचविण्याची मानस सादिक पठाण यांनी व्यक्त केला. त्यावेळेस मोहसीन पठाण मोसिन शेख तंबोली तंबोली, अल्ताफ शाह, विकास अहिरे, अल्ताफ शेख, सलीम लाला, शफाफ शेख तबरेज खान व अन्य उपस्थित होते
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा