ब्रेकिंग
महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा पाचोरा च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन, परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते
धुळे (प्रतिनिधी) महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा पाचोरा च्या दिनदर्शिकेचे (2023) प्रकाशन आज धुळ्यात परमपूज्य संत सखाराम महाराज गादीपती परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्र वाणी युवा मंच पाचोरा दरवर्षी प्रमाणे दिनदर्शिका प्रकाशित केली जाते या वर्षी पण मोठया उत्साहात धुळे येथे परमपूज्य संत सखाराम महाराज गादीपती परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते मोठया उत्साहात प्रकाशीत करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र पाचपुते (राज्य कार्याध्यक्ष) एस. बी. येवले अप्पा (अमळनेर), महेंद्र महालपुरे (शाखाध्यक्ष), डी.आर. कोतकर सर (संस्थापक शाखाध्यक्ष), अशोक बागड (कार्याध्यक्ष), विजय सोनजे (खजिनदार), योगेश शेंडे सर (उपाध्यक्ष), प्रकाश येवले (ज्येष्ठ संघटक), विवेक ब्राह्मणकार उपस्थित होते.




