आपल खान्देश
श्री क्षेत्र नवे वडधे श्री गोविंद प्रभूंचा अवतारण दिन महोत्सव कार्यक्रम संपन्न
श्री क्षेत्र नवे वडधे श्री गोविंद प्रभूंचा अवतारण दिन महोत्सव कार्यक्रम मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले
झूम मराठी टीम
वृत्त संकलन – संजय पाटील
भातखंडे बुद्रुक ता,भडगाव श्री श्रेत्र वडधे येथे १९ रोजी कलियुगातील ईश्वर अवतार भगवान श्री गोविंद प्रभूंचा अवतार दिन महोत्सव महानुभाव पंथाच्या प्रमुख धर्माचार्याच्या शुभहस्ते संपन्न करण्यात ,आला.या कार्यक्रमाचा शुभारंभ जाळीचादेवचे परमा॑डील्य आचार्य श्री लासूरकर मह॑तजीनी धर्म ध्वजाचे आरोहणाने केला. सभागृह उद्घाटन वडगाव अ॑बेचे आचार्य श्री येळमकर शास्त्री महंतजीनी केले.कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष उपाध्यकुळआचार्य श्री बिडकर बाबा महंतजीनी या विश्वात श्रीगोविंदप्रभूनी आपल्या अनेक लीळामधून जातिभेदाचे उच्चाटन केल्याचे सांगितले.निर्गूण ब्रहम श्रीप्रभु व विचार सुत्रार्थ प्रकाश या दोन आध्यात्मिक ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले .कोरोना संक्रमण काळात निस्वार्थ संतसेवा करणार्या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना शुभाशिर्वाद देवून सन्मानित करण्यात आले . स्वागताध्यक्ष परभणी येथील आचार्य श्री तेल्हारकर महंतजी यांनी ८०० वर्षापासून जतन केलेले परमेश्वराचे वस्त्र सर्वांना दर्शनासाठी आणले होते .तर आचार्य श्री मराठेजीशास्त्री महंत याऺनी दिप प्रज्वलनाने उद्घाटन केले . परमेश्वरानंतर फक्त गुरुच आपले सर्वस्व आधार भुत असतात ,असे प्रतिपादन प्रास्ताविकात धुरंधरबुवानी केले.
धुळे येथील महंत श्रीजायराज शास्त्री महंतजीनी गोविऺदप्रभु हे प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार आहेत असे लक्षात आणून दिले.श्रीविश्वनाथमहंतजीनी समर्पणाचे महत्व सांगितले . महंत निलेशदादानी अवताराचे प्रकार सांगितले.सभेचे अध्यक्षपद कनाशीचे आचार्य श्री खामणिकर महंतजीनी भुषविले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक आचार्य श्री लांडगेमहंतजी व आचार्य श्रीगौंरव्यास महंतजी जाळीचा देव होते
आभार कंठिकर महंतजीनी मानले.नागपूरचे महंत श्री बांधकरजीनी सुत्रसंचलन तथा वचनपाठाची संथा दिली.याप्रसंगी श्री रमेशधुर्जड नाशिक यांनी संन्यास धर्म घेतला . पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संतदर्शनाचा लाभ घेत वडधे येथे भक्तगणांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले . या कार्यक्रमाला मुंबई, नागपूर, नाशिक, इंदोर,तथा खांदेशभरातून आलेल्या भक्तगणांनी धार्मिक विधीचा लाभ घेतला.
वृत्त संकलन – संजय पाटील


