वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार, काय बंद राहणार?
झूम मराठी न्यूज डिजिटल मीडिया
आपल्या शहरांत वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार, काय बंद राहणार?
राज्य सरकारने जाहीर केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची सविस्तर माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली आहे. सोमवारी सकाळी 7 ते शुक्रवारी रात्री 8 वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार, काय बंद राहणार? पर्यंत जमावबंदी आहे. तर शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असेल अशी माहिती फणसळकर यांनी दिली आहे. या दोन दिवसात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच जे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत त्यांनी हॉल तिकीट जवळ बाळगणे गरजेचे आहे अन्यथा त्यांनाही कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. एवढंच नाही तर शनिवार आणि रविवार पुढील दोन दिवस खाजगी वाहनांना पूर्णतः बंदी असून विनाकारण खाजगी वाहनचालक रस्त्यावर दिसल्यास ती वाहने जप्त देखील केली जाऊ शकतात.
या काळात मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉकही बंद असेल. तसेच कोणत्याही कारणाविना रस्त्यावर फिरताना जर कोणी दिसले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही विवेक फणसाळकर यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय विनाकारण घराबाहेर पडू नये असं त्यांनी नागरिकांना आव्हान देखील केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही सेवा सुरू ठेवल्यास त्यांना देखील कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाऊ शकते असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, दवाखाने हे सुरू राहणार असून अगदीच गरज असेल तरंच पाळीव प्राण्यांच्या मालकांनी बाहेर पडावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.




