गुन्हेगारी

अश्लिल पोस्ट टाकून 36 वर्षीय डॉक्टर तरुणीची बदनामी; शरीरसुखाची मागणी करणार्‍या फोनवरुन प्रकार उघडकीस

पुणे – मेट्रोमनी वेबसाईटवरील ओळखीनंतर त्यांची तीन वर्षे मैत्री होती. मात्र, त्याने दुसर्‍या मुलीबरोबर साखरपुडा केला. याबाबत या डॉक्टर तरुणीने विचारणा केल्यावर त्याने या तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करुन त्यावर अश्लिल पोस्ट टाकल्या. त्यामुळे या तरुणीला अनेकांनी फोन करुन शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पुण्यातील पोलीस ठाण्यात एका ३६ वर्षाच्या डॉक्टर तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुधांशु प्रदीपकुमार पारीख (वय ३७, रा. आदित्य रेसिडेन्सी, पिंपळे निलख) याच्याविरुद्ध गुन्हा  दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी भारत मेट्रोमनी या वेबसाईटवर लग्नाची जाहिरात दिली होती. या जाहिरातीवरुन त्यांची आरोपीशी ओळख झाली. २०१६ ते २०१९ दरम्यान फिर्यादी व आरोपी यांच्यात व्यवस्थित बोलणे चालू होते. फिर्यादीबरोबर बोलणी सुरु असताना आरोपीने दुसर्‍या मुलीसोबत साखरपुडा केला. त्याबाबत फिर्यादीने विचारणा केली. तेव्हा आरोपी व त्याच्या आईवडिलांनी फिर्यादी यांच्या क्लिनिकवर येऊन फिर्यादींना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी काम करीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये फोन करुन फिर्यादीची बदनामी केली. तसेच आरोपीने एका वेबसाईटवर फिर्यादीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार केली. त्यावर अश्लिल पोस्ट टाकल्या. त्यामुळे त्यांना अचानक अनेक अनोळखी लोकांनी फोन करुन त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. हे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक चाटे तपास करीत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे