रामदास आठवले यांची भेट घेऊन धनगर समाजाला न्याय दयावा अशी विनंती केली
महाराष्ट्रातील धनगर आरक्षणासाठी मा.ना.रामदासजी आठवले साहेब [केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय,भारत सरकार] यांची भेट घेवुन केंद्र सरकार कडे पाठपुरावा करुन आरक्षणातील अडथळे दुर करण्याची मागणी.
दिलीप परदेशी- झूम मराठी न्यूज
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय सविंधानाने आम्हाला दिलेला अधिकार धनगर समाजाला मिळावा, व त्वरित र व ड हा फरक निकाली काढावा व धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करून समस्त महाराष्ट्रातील २ कोटी धनगर समाजाला न्याय दयावा अशी विनंती मा.ना.रामदासजी आठवले साहेबांच्या सविंधान बांद्रा मुंबई या निवास्थानी मागणी करण्यात आली.
धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य व उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ (रजि.) च्या वतीने श्री ज्ञानेश्वर गोटू परदेशी (अध्यक्ष. उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ, / ठाणे जिल्हा धनगर समाज संघर्ष समिती), श्री.संदिप तानाजी पांढरे (नवीमुंबई जि. अध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती) श्री. महेंद्र गोकुळ परदेशी (अध्यक्ष कल्याण शहर उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ,) श्री सुनिल शंकर परदेशी (अध्यक्ष कल्याण धनगर समाज संघर्ष समिती) ,श्री अजय खंडू हाके (अध्यक्ष ठाणे शहर धनगर समाज संघर्ष समिती) , श्री गणेश विठ्ठल गढरी (युवा अध्यक्ष अंबरनाथ तालुका) ,श्री संजय गेंदा परदेशी सामाजिक कार्यकर्ता आणि कल्पना परदेशी (मुंबई विभाग महिला प्रमुख) यांच्या शिष्टमंडळाने ही मागणी केली आहे.

मा.ना.रामदासजी आठवले साहेबांनी या बाबत लवकर केंद्रीय व इतर विभागातील अधिकारी यांची बैठक घेऊ,व दि.१०/२/२१ रोजी मा.पद्मश्री खासदार डॉ.विकासजी महात्मे साहेबांच्या पुढाकाराने इन्टरनॕशनल बाबासाहेब आंबेडकर भुवन नवी दिल्ली येथे जशी बैठक बोलवली होती,तशीच बैठक अदिवासी विकास मंत्री यांच्या सोबत पुन्हा घेवु व आरक्षण सह राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार ,UPSC व इतर परिक्षा साठी धनगर जमातीतील विद्यार्थ्यांना साठी होस्टेल,राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई याचे नवी दिल्ली येथे स्मारक इ कामासाठी पुढाकार घेवु असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मा.ना .रामदासजी आठवले साहेब अतीशय व्यस्त असताना सुदधा सर्व शिष्टमंडाळातील सदस्याचे नाव, गाव इ. आपुलकीने विचार पुस केली व खासदार पद्मश्री विकासजी महात्मे साहेबांसोबत सर्वाना दिल्ली येथे येण्याचे आमंत्रण दिले, ज्ञानेश्वर परदेशी यांनी बहुजनाचे नेते व विदयमान केंद्रीय मंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेबांनी धनगर आरक्षणासाठी पुढाकार घेवुन तत्परतेने केंद्रीय मंत्र्यांबरोबर बैठक लावल्या बददल ऋण व्यक्त केले व आभार मानले.




