आपल खान्देश

बहुजन मुक्ति पार्टीचे जळगाव महानगरपालिकाच्या ढिसाळ कारभारा विरोधात एक दिवसीय धरने

बहुजन मुक्ति पार्टी जळगाव महानगर च्या वतीने जळगाव महानगरपालिका येथे एक दिवसीय धरने प्रदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) बहुजन मुक्ति पार्टीचे जळगाव महानगरपालिकाच्या ढिसाळ कारभारा विरोधात एक दिवसीय धरने आयोजित करण्यात आले आहे, जळगाव शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने सर्वच नागरिक त्रस्त आहेत.

जळगाव शहरातील परिस्थिति काय झालेली आहे व जळगाव शहरामधे काय चालले आहे आज आपण जळगाव शहरातील अनेक समस्यांना तोंड देत आहोत आणि जळगाव शहरमहानगरपालिका या समस्या कुठेही व कुठल्याही प्रकार याचे निवारण होताना दिसत नाही आहे आज जळगाव शहरातील रस्ते, गटार, छ. शिवाजी नगर पूल, पसरलेल्या डेंगू व तस्यम अजारावरिल उपचार अश्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत पन यावर कुठे ही नियोजन महानगर पालिकेचे दिसत नाही आहे म्हणूनच या सर्व समस्यांना घेऊन बहुजन मुक्ति पार्टी जळगाव महानगर तर्फे एकदिवसीय धरने प्रदर्शन करत आहोत जळगाव शहरातील समस्त नागरिकांना आव्हान करण्यात येते की एक दिवशीय धरने प्रदर्शन मधे प्रचंड संखेने उपस्थिति द्यावी. असे विजय सुरवाडे यांनी मीडियाला माहिती दिली

बहुजन मुक्ति पार्टी जळगाव महानगर तर्फे खलील मागण्या घेऊन एक दिवशीय धरने प्रदर्शन करत आहोत.

१)शहरातील डेंगू, मलेरिया,हिवताप या रोगाचे रुग्ण वाढत आहे या रोगांवर नियंत्रणत आणण्यासाठी म.न.पा. आरोग्य विभागाने त्वरित उपाय योजना करने.

२)जळगाव शहरातील अनेक वसाहति(खड़े प्लॉट)बिना N.A.होताच भूमाफ़ियानी गरीब लोकांना प्लॉट दिलेले आहेत या वसाहति त्वरित एन.ए. ची परवानगी द्यावी.

३)शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने सर्वच नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे महानगरपालिकेने तात्काळ दुरुस्ती करावी.

४)छ. शिवाजी नगर उड़ानपुल चे रखड़लेले काम लवकरात लवकर सुरु करावे.

५)जळगाव शहरातील विविध ठिकाणी असलेले बहुजन महापुरुषाचे पुतळ्यांचे शुशोभिकरण करुण त्याना संरक्षण देण्यात यावे.

६)नागरिकांच्या घरात भाड़ेकरु नस्तानाही भाड़ेकरु असल्याच्या नोटीसा देऊन नागरिकांची आर्थिक पिळवनुक थाबवावि.

७)महानगरपालिकेच्या ओपन स्पेस वर खाजगी बांधकाम करणार्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

2 सप्टेंबर गुरुवारी सकाळी १०:०० ते दुपारी ४:००वाजेपर्यंत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे