गुन्हेगारी

महिलेचा विनय भंग केल्याने प्रकरणी बदरखे येथील आरोपी तरुणांस दोन वर्षाचा करावास!

तीन वर्षा पूर्वी कलम ३५४ (अ) नुसार पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणात चार साक्षीदार तपासले आहेत.

झूम मराठी वृत्तसेवा 

पाचोरा तालुक्यातील बदरखे गावातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान, तीन वर्षानंतर हा निकाल लागला आहे.

याप्रकरणी दि. ५ डिसेंबर २०१८ रोजी कलम ३५४ (अ) नुसार पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणात चार साक्षीदार तपासले आहेत. बदरखे येथील नितीन सुभाष पाटील याने गावातील एका महिलेचा विनयभंग केल्याने या केसचा निकाल तीन वर्षांनंतर आज दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी लागला आहे. न्यायमूर्ती एफ. के. सिद्दीकी यांनी या गुन्ह्यात आरोपी नितीन पाटील यास दोन वर्षाचा कारावास व  पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 



 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे