आपल खान्देशमहाराष्ट्रसखी

नांदगाव तालुक्यात अंजुमताई कांदे यांनी विविध तांड्यावर उपस्थित राहून संत  सेवालाल महाराज जयंती उत्साहात सहभाग घेतला.


नांदगाव (मुक्ताराम बागुल) नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुमताई सुहास कांदे यांनी आज संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्ताने नांदगाव तालुक्यातील विविध तांड्यावर उपस्थित राहून संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीत सहभाग नोंदवला. 

नांदगाव तालुक्यातील वसंत नगर तांडा तसेच भिकू तांडा येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. देकु सेवागड तांडा येथील आई जगदंबा माता व संत सेवालाल महाराज मंदिर ग्रामपंचायत आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव प्रसंगी सौ. अंजुमताई सुहास कांदे या उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना अंजुमताई कांदे यांनी बंजारा समाजातील मुलींना शिक्षणात प्रेरणा मिळावी म्हणून बारावीच्या परीक्षेत पहिल्या तीन मध्ये येणाऱ्या मुलींना भविष्यातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचे जाहीर केले. बंजारा समाजाप्रती नेहमीच आमदार सुहास कांदे व सर्व कुटुंबीयांना प्रेम आहे आणि यापुढेही राहणार. तसेच आपल्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षण द्या असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. बंजारा समाजातील तरुण मोठ्या संख्येने भारतीय सेनेत सेवा देत असून त्यातील काही जवान या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांचा अंजुमताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुमारी गायत्री सुनील चव्हाण या विद्यार्थिनी उत्कृष्ट असे भाषण केले. अंजुमताईंनी त्या विद्यार्थिनीचा सत्कार करत तिला 501/ रुपयांचे बक्षीस यावेळी दिले.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीता ताई बागुल, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे, एन के राठोड, कांतीलाल चव्हाण, गोपालाल राठोड, गोरख चव्हाण, देखो ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव, भगिनी उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे