आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज घट झाल्याचं पाहायला मिळालंय

जळगाव प्रतिनिधी । Corona Update- राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज घट झाल्याचं पाहायला मिळालंय. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकुण ८०२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार ९९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरात संसर्ग वाढलेला दिसून येत आहे.

 आजची आकडेवारी

जळगाव शहर- १७१, जळगाव ग्रामीण-६४, भुसावळ-६९, अमळनेर-२४, चोपडा-४४, पाचोरा-२८, भडगाव-१०, धरणगाव-२०, यावल-१९, एरंडोल-७३, जामनेर-५७, रावेर-६४, पारोळा-१५, चाळीसगाव- ६९, मुक्ताईनगर-२३, बोदवड-२६ आणि इतर जिल्ह्यातील २६ असे एकुण ८०२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या अहवालानुसार आजपर्यंत १ लाख २४ हजार ६४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख १२ हजार ३५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित १० हजार ५५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १९ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे