Pachora Crime’s – पाचोरा पोलिसांनी चोख कामगिरी बाजवत, दुसर्या दिवशीही दोन तरुणांकडून गावठी कट्टा जप्त..
पाचोरा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दिवसांपूर्वी गावठी कट्टा व जिवंत काडतूस पकडल्यानंतर पाचोरा पोलिसांनी चोख कामगिरी बाजवत दुसर्या दिवशीही पाचोरा शहर लगत पुंनगावातील तरुणांकडून गावठी कट्टा जप्त केल्याने अवैधरीत्या गावठी कट्टा बाळगणार्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
पाचोरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर कार्यवाही करण्यात आली आहे. पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दिवसांपूर्वी गावठी कट्टा व जिवंत काडतूस पकडल्यानंतर पाचोरा पोलिसांनी दुसर्या दिवशी पुन्हा पूनगाव, ता.पाचोरा येथील तरुणांकडून गावठी कट्टा जप्त केल्याने अवैधरीत्या गावठी कट्टा बाळगणार्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. सदर राहुल अनिल परदेशी वय 27, पूनगाव, ता.पाचोरा व रामचंद्र गोपीचंद परदेशी वय 34, पूनगाव ता.पाचोरा अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. सदर कारवाई बुधवारी रात्री 11.30 वाजता करण्यात आली आहे. गोपनीय सूत्रांच्या माहितीवरून पूनगावातील दोघा संशयितांकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा निरीक्षक राहुल खताळ यांनी पोलिसांच्या पथकाला कारवाईचे निर्देश दिले असता यामध्ये पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुरेश पाटील, पोलीस हवालदार विश्वास देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल संदीप भोई, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे आदींच्या पथकाने महादेव मंदिराजवळील पोल्ट्री फार्मजवळ संशयीत येताच त्यांना अटक केली तसेच गावठी कट्टा जप्त केला. पोलीस कर्मचारी प्रकाश शिवदे यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कार्यवाही पाचोरा पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे.



