ब्रेकिंग

बायको आणि अल्पवयीन मुलाने केला, नवऱ्याचा खून..

घरात नेहमी होणाऱ्या वादातून झालेल्या भांडणामध्ये संतापाच्या भरात मुलाने त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

नवरा नेहमी दारुच्या नशेत घरी येत असल्याने बायकोने आपल्या अल्पवयीन मुलासह लोखंडी रॉड व विटाने पित्याला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विकास पाटील यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कुरंगी गावात घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात मुलासह त्याच्या आईविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावात विकास शंकर पाटील यांचा वारंवार कौटुंबिक वाद सुरु होता. दि. २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास विकास पाटील यांचे पत्नी सोनाबाई व मुलासोबत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात मुलाने वडीलांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत विकास पाटील यांच्या पाठीवर आणि मानेवर गंभीर दुखापत झाले होते.

विकास पाटील यांच्या घरातुन आरडाओरडचा आवाज आल्याने शेजारी आले. तेव्हा विकास पाटील हे घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. त्यांना तात्काळ ग्रामस्थांनी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी विकास पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने जळगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी विकास पाटील यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर मायलेकाला अटक घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये सोनाबाई विकास पाटील व त्यांचा अल्पवयीन मुलगा यांचे विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाबाई पाटील व अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे.

विकास पाटील नेहमीच दारुच्या नशेत घरी येत असल्याने त्याचे पत्नीसह मुलासोबत नेहमी वाद होत होते. वारंवार होणाऱ्या वादातून रविवारी झालेल्या भांडणामध्ये संतापाच्या भरात त्यांच्या मुलाने त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विकास पाटील यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची चर्चा सुरू आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे