आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोऱ्यात आज मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शबीराचे आयोजन..

पाचोऱ्यात आज मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शबीराचे आयोजन करण्यात आले आहॆ. पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागातील बोहरा हॉल येथे आज दिनांक ०२/११/२०२२ रोजी मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वर्गीय अमोल शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त व काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष राहुल शिंदे यांच्य वाढदिवसा निमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव आणि सचिन सोमवंशी युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया व बिन टाक्याचे फेको पद्धतीने अल्कोन इफिनीटी ओझील अमेरिकन फेको मिशन द्वारे तपासणी करण्यात येणार आहे.

सदरच्या शिबिरातील रुग्णांनाचे डोळ्याच्य पडद्याचे स्कॅन व डोळ्याच्या पडद्याचे सोनोग्राफी व डोळ्यांच्या पडद्यासाठी लेझर सुविधा पडद्यांची बिनाटाक्याची शस्त्रक्रिया मोफत स्वरूपात होणार आहे सदर चे शिबीर हे बाहेरपुरा भागातील कामगार कल्याणच्या शेजारी बोहरा हॉल येथे सकाळी 10 ते 2 पर्यंत तपासणी होणार आहे. सदरच्या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे संयोजकांनी आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे