बोलठाण उर्दू शाळेच्या कारभाराविरोधात अमरण उपोषण,
बेशिस्त शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे, शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थ्यांचे पालक वर्ग, ग्रामस्थांची मागणी
नांदगाव (प्रतिनिधी – मुक्ताराम बागुल) नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या गलथान कारभाराच्या विरोधात , बेशिस्त शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने, महिला शिक्षिका व शाळेचे मुख्याध्यापक हे सतत गैरहजर रहात असल्याने , लोकप्रतिनिधी, शासन प्रशासन यांचे तक्रारीकडे व शाळेतील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक शिक्षणाकडे असल्याने व व महिला शिक्षिका तांबट शाईन अली मोहम्मद यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करणेकामी तसेच शाळेचे मुख्याध्यापक अमिनुद्दिन चिरागुदिन शेख हे देखील सतत गैरहजर राहून येथील शाळेतील दप्तर असलेल्या कपाटास कुलूप लावून गेल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निर्गम उतारा व इतर दाखले देण्यास अडचण निर्माण होत असल्याने व मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आज दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी गुरुवार पासून नांदगाव तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास सुरुवात होणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बोलठाण जिल्हा परिषदेच्या शाळेच्या महिला शिक्षिका दिनांक 26 जून 2019 रोजी येते शाळेत रुजू झाल्यापासून ते आज पर्यंत शाळेत हजर झाले नाहीत परंतु त्यांचे शाळेच्या हजेरी रजिस्टर मध्ये मुख्याध्यापक अमिनुद्दिन शेख हे तांबट मॅडम यांच्या घरी जाऊन सह्या घेऊन हजर असल्याचे दाखविल्याचे समजते.. बोलठाण येथील उर्दू शाळेत पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग आहेत दोन शिक्षक हजर राहत असल्याने दोन वर्गामध्ये चार चार वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते म्हणजे ही शाळा आहे की कोंडवाडा. स्वार्थी बेशिस्त शिक्षकावर कारवाई झालीच पाहिजे, संबंधित गैरहजर शिक्षकांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, शाळेची सुधारणा झाली पाहिजे, मागील तीन शैक्षणिक सतरापासून आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान करणारी महिला शिक्षिका श्रीमती तांबट शाहिन अली मोहम्मद यांच्या खातेनिहाय चौकशी लावून वेतन वसुली केली पाहिजे, गैरहजर शिक्षकावर कारवाई करून आमच्या शाळेत पोरी शिक्षक दिलेच पाहिजे, प्रभारी मुख्याध्यापक यांच्यावर कायदेशीर कारवाई त्वरित करून घेतली पाहिजे, व मुख्याध्यापक यांनी केलेला काळाबाजार करून कारवाई झालीच पाहिजे आदि मागण्यांसाठी आज 17 फेब्रुवारी 2022 रोजी गुरुवारपासून नांदगाव तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास बसणार आहे.
सदर निवेदनावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हाफिज इद्रीस रज्जाक सय्यद, उपाध्यक्ष निसार शहा व पदाधिकारी, विद्यार्थ्यांचे पालक वर्ग आणि ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत.


