जयपूर (वृत्तसंस्था) : लैंगिक अत्याचारप्रकरणात कारावासाची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला कोरोनाची लागण झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. काही तासांपूर्वीच आसारामला महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार आहे.
त्याच्यासोबत तुरुंगातल्या १२ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचं कळत आहे. आसाराम बापूला गेल्या काही दिवसांपासून करोनाची सौम्य लक्षणं दिसत होती. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक तपासणीनंतर त्याला आयसीयूत दाखल करण्यात आलं.
फेब्रुवारी महिन्यात त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्याला जोधपूरमधल्या या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तपासणी केल्यानंतर विशेष काही गंभीर नसल्याचं लक्षात आलं आणि दोन दिवसांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

आसाराम सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवास भोगत आहे. आपल्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २०१४ साली त्याला इंदौरमधून अटक करण्यात आली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा