गुन्हेगारीमराठवाडा
जिवे मारण्याची धमकी आणि खंडणी वसुली प्रकरणी अक्षय मोहन बोऱ्हाडे याला अटक,
अक्षय बोऱ्हाडे याने जुन्नर मधील एच.पी. गॅस वितरक रूपेश प्राणलाल शहा यांचे नागरी वस्तीत असलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या गोडावूनची जुन्नर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून माहीती अधिकारात माहीती मागविली होती.ही माहिती मागवण्याबरोबरच तो रूपेश शहा यांना फोन करून धमकी देत होता. धमकीत माझी माणस तुझ्याकडे पाठवली आहेत, त्यांच्याकडे पैसे दे आणि माझ्या संस्थेला येणारा खर्च तू कर नाहीतर तुझ्या विरोधात फेसबुक लाईव्ह करून तुझा व्यवसाय कसा चालतो याच बिंग फोडतो, मग बघतो की तुझा व्यवसाय कसा चालतो.अशी वारंवार धमकी देत होता.
दरम्यान रूपेश शहा यांनी याकडे दुर्लक्ष केल होत. तसेच ते अक्षयला कोणताच प्रतिसाद देत नव्हते. परिणामी संतप्त अक्षयने फोन करून पैशांची मागणी करत रूपेश शहा यांना जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी रूपेश शहा यांनी खंडणीची तक्रार केली.या तक्रारीला अनुसरून वितरकाला खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिलेप्रकरणी शिरोली बुद्रुक येथील अक्षय मोहन बोऱ्हाडे याला जुन्नर पोलिसांकडून मंगळवार रात्री उशिरा अटक करण्यात आली.दरम्यान अक्षयला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली व बुधवार रोजी प्रथम वर्ग मा.जुन्नर न्यायालयात त्याला हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहीती पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना पोलीस म्हणाले, खंडणी मागणीसारखे प्रकार आणखी कोणासोबत होत असल्यास नागरिकांनी निडरपणे समोर येऊन तक्रार द्यावी, संबंधितांवर योग्य ती पोलीस कारवाई करण्यात येईल. अक्षयने यापूर्वीही फेसबुक लाईव्ह करत जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे तसेच स्थानिक सर्वच पक्षांच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत शिवसेना उपतालुका प्रमुख अविनाश करडीले, शहर प्रमुख चंद्रकांत डोके तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांसह पदाधिकारी यांनी बोऱ्हाडे याच्याविरूध्द कडक कारवाई करण्याबाबत निवेदन दिलेले आहे.




