महाराष्ट्र

“सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ , चंद्रपूरमधील दारुबंदी उठवल्यानंतर पडळकरांचा टोला

मुंबई | चंद्रपूरमधील दारू बंदी उठवण्याच्या सरकारला निर्णयावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. “वसुली सरकारला काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ आहे. सरकारला हा मेवा जास्त महत्वाचा वाटतो,” अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांनी दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. मात्र, ठाकरे सरकारने हा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला त्यावरच पडळकर यांनी टीका केली आहे.

काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील काही काळापासून चंद्रपूरमधील दारुबंदी हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. परिणामी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. याच मुद्द्याला घेऊन पडळकर यांनी काँग्रेस तसेच ठाकरे सरकारला घेरलं. त्यांनी “काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ या सरकारला आहे,” असा शाब्दिक हल्ला केला. तसेच पुढे बोलताना “मी यांना जाहीरपणे विचारतो. मेवा मिळत नसेल म्हणून तुम्ही बहुजनांचे हक्क मंत्रिमंडळात मांडत नसाल, तर मी माझ्या बहुजन बांधवांकडून आपल्यासाठी लोकवर्गणीने मेवा जमा करण्याचे आवाहन करू शकतो,” असेही पडळकर म्हणाले आहेत.

राज्य सरकार बहुजनांच्या हक्कासाठी लढत नसल्याचा आरोप केला. “वसुली करण्यासाठी राज्य सरकारने बहुजनांचे हक्क गहाण ठेवले आहेत. बहुजनांचे हक्क गहाण ठेवणाऱ्या या सरकारचा मी धिक्कार करतो,” असे खडे बोल पडळकर यांनी सुनावले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे