आपल खान्देशराजकीय

त्या नगरसेवकांचा अपात्रतेच्या भीतीपोटी शिवसेनेत प्रवेश : एकनाथ खडसे

जळगाव : जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. सहा नगरसेवकांमध्ये भाजपचे गटनेते यांचाही समावेश आहे. मंत्री गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते.

अपात्रतेच्या भीतीपोटीच मुक्ताई नगर पंचायतीच्या त्या नगरसेवकांनी पक्षांतर केलं असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. यावेळी बोलतांना खडसे यांनी म्हटलं की, “मुक्ताईनगर नगरपंचायतीत भाजपाच्या तेरा आणि 1 अपक्ष अशी 14 संख्या आहे. यापैकी आज दहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत आहे. परंतु आज केवळ भाजपाचे चार आणि एक अपक्ष असे पाच नगरसेवकच शिवसेनेकडे गेल्याचे दिसून येत आहे. त्यापैकी भाजपाची एक नगरसेविका ही तीन अपत्ये असल्याच्या कारणाने अपात्र झालेली आहे. तर उर्वरित त्या तीन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार असल्याच्या भीतीपोटी तसेच त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई होऊ देणार नाही, अशी खात्री संबंधितांनी दिली असल्यामुळेच त्या नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या दहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश ही बातमी दिशाभूल करणारी आहे.” माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताईनगर येथे बोलताना दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे