देश-विदेश

राज्यांना लस मोफतच देणार; किंमतीवरून केंद्राचं स्पष्टीकरण!!

झूम मराठी न्यूज वेब मीडिया 

राज्यासाठी लशीची किंमत वेगळी आणि केंद्रासाठी वेगळी असल्यानं हा दुजाभाव कशासाठी असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.

नवी दिल्ली – देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून लसीकरण मोहिम आता एक मे पासून व्यापक करण्यात येत आहे. एक मे पासून देशात 10 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, देशात लशीच्या किंमतीवरून राजकारण तापलं आहे. राज्यासाठी लशीची किंमत वेगळी आणि केंद्रासाठी वेगळी असल्यानं हा दुजाभाव कशासाठी असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. त्यातच आता सीरम इन्स्टिट्यूटने स्पष्टीकरण दिलं असून केंद्रानेही लशीच्या किंमतीबाबत स्पष्ट केलं आहे. आऱोग्य मंत्रालयाने म्हटलं की, सर्व राज्यांनी लस मोफतच दिली जाईल. दोन्ही लशी एकाच किंमतीला खरेदी करण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, दोन्ही लशींची खरेदी भारत सरकार 150 रुपये प्रति डोस करत आहे. भारत सरकारने खरेदी केलेली लस राज्यांना मोफत देण्यात येईल असंही केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. एक मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे