जळगाव : कापसाच्या नवीन वाणांची माहिती, कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण व अन्य बाबींसंदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, यासाठी जागतिक कापूस दिनानिमित्त येत्या गुरुवारी (ता. ७) कृषी विभागातर्फे एकदिवसीय राज्यस्तरीय कापूस परिषद होणार आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी ही माहिती दिली.
या परिषदेला कृषिमंत्री दादा भुसे, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी सचिव, कृषी आयुक्त, तसेच राहुरी, परभणी व अकोला कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय स्तरावरील कृषी संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, कृषी निविष्ठा कंपन्यांचे प्रतिनिधी आदींसह औरंगाबाद, बुलडाणा, जालना, अकोला, नंदूरबार व धुळे या जिल्ह्यांतून निवडक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा