आपल खान्देश

पाचोरा कासार समाज बांधवांतर्फे एका गाव गुंडावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पाचोरा तहसीलदारांना करण्यात आली 


पाचोरा शहर व तालुक्यातील सोमवंशीय कासार समाजा तर्फे मा. तहसीलदार साहेब प्रवीण चव्हाणके यांना निवघा ता. मुदखेड, जि. नांदेड येथील आरोपी ज्ञानेश्वर पवार याला पोस्को (बाल लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई कार्यवाही करणे बाबत निवेदन देण्यात आले.

VIDEO | रेल्वे रुळावरच रखडली, ट्रकवरून चालताना ४ महिन्यांचं बाळ हातातून निसटलं अन् वाहत्या पाण्यात पडलं..

____________________________________

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुदखेड तालुक्यातील निवघा गावातील कासार समाजाची अल्पवयीन मुलगी कुमारी सपना सतीश पेदे वय 17 वर्ष हिचा गावगुंड ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या याने मागील वर्षभरात अनेक वेळेस छेडछाड करून तिचा छळ करीत होता. त्या छळाला कंटाळून अखेर दिनांक 12 जुलै 2023 रोजी कुमारी सपना हिचा नाहक बळी घेतला, मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीस पोस्को (बाल लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल करावा व आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील सर्व सोमवंशी क्षत्रिय कासार समाज यांनी केली.

आरोपी ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या या गाव गुंडावर पोस्को (बाल लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सूचना करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सोमवंशी क्षत्रिय कासार समाज आंदोलन केल्यास होणाऱ्या परिणामास महाराष्ट्रातील कासार समाज जबाबदार राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी व सहकार्य करावे अशी विनंती सदर निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदनाची प्रत पाचोरा – भडगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार- मा. किशोर आप्पा पाटील- यांना हि देण्यात आली.

या प्रसंगी अनिल कासार, अतुल शिरसमणे, प्रशांत कासार, दिलीप कासार, विजय रामदासशेठ कासार , रामराव बाजीराव कासार, मनोज कासार, राजेश दामोदर कासार, योगेश कासार, गणेश कासार, प्रमोद कासार, अविनाश कासार, प्रदीप कासार, किशोर कासार, अजिंक्य कासार, जितेंद्र कासार, परेश कासार, आणि समाज बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे