गुन्हेगारीब्रेकिंग

पाचोरा माजी आमदार यांची सोशल मीडीयावर बदनामी कारक मजकूर टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

झूम मराठी पाचोरा – पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांची सोशल मीडीया बदनामी कारक मजकूर टाकल्याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रणजीत अभिमन्यू पाटील हे सद्यस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकपदी नेमणुकीस आहे. कृउबा मुख्य प्रशासक हे माजी आमदार दिलीप वाघ हे आहेत. सदर मार्केट कमिटीचे अखत्यारीत मार्केटचे समोरील बाजूस पाचोरा रोडला लागून सुमारे १०० गाळे आहेत. त्यापैकी बरेचसे गाळे हे बेकायदेशीर रित्या करारनामे न करता लोकांनी ताब्यात घेवून वापरत होते. सदर बाबत गाळे धारकांना आम्ही करारनामे करण्यासाठी व थकीत भाडे भरण्यासाठी गाळेधारकांना नोटिसा पाठविल्या होत्या. जवळजवळ सर्वच गाळे धारकानी नोटिसांचे पालन करून नियमानुसार करारनामा केले. मात्र या उलट पाचोरा शहरातील निळकंठ प्रल्हाद पाटील यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोराचे मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांच्या बाबतीत ७० ते ८० लाख रुपये दिलीप वाघ यांनी मार्केट कमिटीचे गाळ्यांचे प्रकरणात जमा केलेले आहे. अशी फोनवर आपसात दोन लोकांमध्ये बोलणारी एक संभाषण ऑडिओ क्लिप तयार करून सदर क्लिप ही “जगा आणि जगू द्या” या व्हाट्सअप ग्रुपवर ३१ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास प्रसारित करून माजी आमदार दिलीप वाघ यांची बदनामी केली. सोबत प्रशासक मंडळाची देखील बदनामी केली आहे. याविषयी फिर्यादी रणजीत पाटील यांना त्यांचे मित्र अभिजीत पवार यांनी कळविली. व सदर क्लिप आरोपीने यांने फिर्यादीस पाठविले म्हणून फिर्यादी यांची निळकंठ पाटील रा. पाचोरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे