आपल खान्देश

शेतकऱ्याची मुलगी झाली गुलाबराव पाटील यांची सून, मंदिरात पार पडला लग्नसोहळा..

खेड्यापासून शेतकरी ते पानटपरी चालक राहिलेल्या गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात कोणताही बडेजाव न राखता साधे पणाने हा विवाह करण्याचा प्रयत्न केला

मोठ्या राजकिय नेत्याची किंवा उद्योग पती परिवारातील न निवडता सर्व सामान्य शेतकरी परिवारातील शोधली आहे. गुलाबराव पाटील यांना राजकीय जीवनात ज्या गावाने आणि माणसांनी साथ दिली अशा चोपडा तालुक्यातील सन्फुले गावामधील भगवान भिका पाटील या शेतकऱ्याची बी इ कॉम्पुटर शिकलेली मुलगी प्रेरणा गुलाबराव पाटील यांची सून होत आहे

झूम मराठी वृत्त 

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पाठोपाठ राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या घरीही सनई चौघाड्यांचे सूर घुमू लागले आहेत. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या द्वितीय क्रमांकाच्या मुलाचा विक्रांतचा सोमवारी जळगाव जिल्ह्यात पाळधी या गावी विवाह पार पडला. मंत्राच्या घरचा विवाह असल्याने केवळ जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण राज्याच लक्ष या विवाह सोहळ्याकडे लागून राहिले होते . मंत्री म्हटलं की शाही विवाह होणार असेच प्रत्येकाला वाटल्या शिवाय राहणार नाही. मात्र गाव खेड्यापासून शेतकरी ते पानटपरी चालक राहिलेल्या गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात कोणताही बडेजाव न राखता साधे पणाने हा विवाह करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पाटलांच्या घरी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी सून म्हणून येणार आहे.

एवढंच नव्हे तर आपल्या घरी येणारी सून ही मोठ्या राजकिय नेत्याची किंवा उद्योग पती परिवारातील न निवडता सर्व सामान्य शेतकरी परिवारातील शोधली आहे. गुलाबराव पाटील यांना राजकीय जीवनात ज्या गावाने आणि माणसांनी साथ दिली अशा चोपडा तालुक्यातील सन्फुले गावामधील भगवान भिका पाटील या शेतकऱ्याची बी इ कॉम्पुटर शिकलेली मुलगी प्रेरणा गुलाबराव पाटील यांची सून होत आहे. मुलगा विक्रांत हा मेकॅनिकल इंजिनियर असून पाळधी गावातच त्याचे वर्क शॉप आहे, मंत्री गुलाबराव राजकारणात सक्रिय असले तरी त्यांच्या सून बाई कडील परिवार मात्र राजकारणात सक्रिय नाही. गुलाबराव पाटील यांची सून उच्च शिक्षित असली तरी एका सर्व सामान्य शेतकरी परिवार मधील असल्याने, गुलाबराव पाटील यांनी गाव खेड्यातील आपली नाळ या निमित्ताने जोडून ठेवली असल्याचं पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे