गुन्हेगारी

भडगाव तालुक्यात एका व्यक्तीला जडीबुटीवाल्याच्या तंबूत जाणे पडले महागात , घडलाय ‘ वेगळाच ‘ प्रकार…

रस्त्याच्याकडेला जडीबुटी विकणार्‍यांवर कारवाई करण्याची राज्यातील कदाचित ही पहिलीच वेळ असावी

झूम मराठी वृत्तसेवा

दिलीप जय परदेशी

रस्त्याच्या कडेत तंबू ठोकून जडीबुटीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाने उपचाराच्या नावाखाली भडगाव तालुक्यातील एका व्यक्तीला हेरले आणि त्याचे विवस्त्र फोटो काढून ब्लॅकमेल करत पैसे उकळण्यास सुरुवात केली.

उपलब्ध माहितीनुसार,  रस्त्यावर तंबू ठोकून जडीबुटी विकणाऱ्या एका व्यक्तीने आपला व्यवसाय सुरु केला होता. भडगाव तालुक्यात कोळगाव परिसरात ही घटना उघडकीला आली असून जडीबुटीचा व्यवसाय करत असताना सदर व्यक्तीला एका व्यावसायिकाने हेरले आणि आणि त्याच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने त्याला तो त्याला आपल्या तंबूत घेऊन गेला. तंबूत गेल्यानंतर उपचाराच्या बहाण्याने त्याने या तरुणाचे विवस्र फोटो आणि व्हिडिओ काढले आणि त्याच्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. ‘ पैसे दिले नाहीत तर हे व्हिडिओ मी सर्वांसोबत शेअर करेल ‘ , अशी धमकी देखील देत त्याने महागड्या औषधांच्या नावाखाली पैसे देखील उकळले.

सुरज सिंग चितोडिया (वय 19 राहणार भुसावळ) असे या आरोपीचे नाव असून तक्रारदाराचे वय हे चाळीस वर्ष असल्याचे समजते. सुरज याने या तक्रारदाराला येता जाता आपल्या जडीबुटीचा प्रयत्न करा असे पटवत हेरले होते. हळूहळू त्याचा विश्वास जिंकण्यात सुरज याला यश आले आणि त्याने तक्रारदाराला तंबूत घेऊन जात उपचाराच्या नावाखाली विवस्त्र केले त्यानंतर तक्रारदाराला अंधारात ठेवत त्याचे फोटो देखील काढले.

शक्तिवर्धक औषधीच्या नावाखाली पीडित व्यक्तीकडून सुरज याने सुमारे तीन लाख रुपये देखील उकळले आणि आणखी एक लाख 68 हजार रुपये तो तक्रारदाराला मागत होता. ‘ पैसे दिले नाही तर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करेल ‘ अशी धमकी देत त्याने तक्रारदाराचे शोषण सुरू केले होते. अखेर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. जळगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या भामट्याचा तंबू उखडून टाकला आहे. रस्त्याच्याकडेला जडीबुटी विकणार्‍यांवर कारवाई करण्याची राज्यातील कदाचित ही पहिलीच वेळ असावी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे