गुन्हेगारी
महिलेचा विनय भंग केल्याने प्रकरणी बदरखे येथील आरोपी तरुणांस दोन वर्षाचा करावास!
तीन वर्षा पूर्वी कलम ३५४ (अ) नुसार पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणात चार साक्षीदार तपासले आहेत.
झूम मराठी वृत्तसेवा
पाचोरा तालुक्यातील बदरखे गावातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान, तीन वर्षानंतर हा निकाल लागला आहे.
याप्रकरणी दि. ५ डिसेंबर २०१८ रोजी कलम ३५४ (अ) नुसार पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणात चार साक्षीदार तपासले आहेत. बदरखे येथील नितीन सुभाष पाटील याने गावातील एका महिलेचा विनयभंग केल्याने या केसचा निकाल तीन वर्षांनंतर आज दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी लागला आहे. न्यायमूर्ती एफ. के. सिद्दीकी यांनी या गुन्ह्यात आरोपी नितीन पाटील यास दोन वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.




