आपल खान्देश

उत्तर महाराष्ट्र गारठला, धुळ्यात सर्वात कमी ५.५ अंश तापमानाची नोंद!

झूम मराठी वृत्तसेवा

राज्यात धुळे येथे सर्वात कमी किमान तापमान ५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. धुळेजिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमान ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परिणामी जिल्हाभरात थंडीची लाट पसरली आहे दिवसभर वातावरण थंड असून थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक ऊबदार कपडे वापरत आहे. नागरिक ठिकठिकाणी शेकोटी पेटवून उब घेताना दिसत आहेत. जळगावत ही गेल्या काही आठवड्यापासून गायब झालेल्या थंडीने परत जोर धरला आहे. जळगाव जिल्ह्यात 14℃ पर्यंत पारा खाली घसरला आहे.

तसेच नागपूर येथे ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील जवळपास सर्वच ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे.

उत्तर भारतातील थंड वारे राज्यात येऊ लागल्याने पुढील दोन दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुणे शहरातील किमान तापमान हे १० अंशाच्या खाली जाण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमान ८ अंशापर्यंत खाली उतरण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे