ब्रेकिंग

अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत प्रेत जागृती, अघोरी प्रकाराने मलकापूर शहर हादरलं

 

बुलडाणा : मलकापूर शहरातील माता महाकाली परिसरातील रहिवासी आशिष गोठी या युवकाच्या वडिलांचे आणि भावाचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांची आत्मशांती झाली नाही म्हणून त्याच्या घरात शांतता भंग पावली, असा त्याचा समज झाला. त्यावर उपाययोजना म्हणून आशिष गोठी याने शुक्रवारी (9 जुलै) रात्री 9 वाजेच्या सुमारास तीन मांत्रिक स्मशानभूमीत पाचारण केले. त्यांच्या उपस्थितीत चक्क दिव्यांची आरास मांडली. तसेच मंत्रोच्चार करून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार केला

घटनेची माहिती वाऱ्यासारखी मातामहाकाली परिसरात पसरली. त्यामुळे नागरिकांनी स्मशानभूमी परिसरात एकच गर्दी केली. मात्र या प्रकाराने संपूर्ण परिसर चांगलाच हादरला. तब्बल दोन तास मांत्रिकांचे प्रेतांसोबत संभाषण सुरु होते, असा दावा केला जातोय. संबंधित प्रकार असंख्य नागरिकांनी बघितला. मात्र भीतीपोटी कुणी पुढे जाण्यासाठी धजावलं नाही

या घटनेची माहिती नागरिकांनी कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आशिष गोठीसह त्या तीन मांत्रिकांना ताब्यात घेतल्यानंतर हादरलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. संबंधित प्रकार हा अतिशय गंभीर असून याप्रकरणी पोलिसांनी जादूटोणा कायद्या अंतर्गत कारवाई करणे अपेक्षित आहे, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केलंय.

दरम्यान सार्वजनिक शांतता भंग केल्याने मलकापूर शहर पोलिसांनी आशिष गोठी याच्याविरुद्ध कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर त्या तीन मांत्रिकांवर सार्वजनिक शांतता भंग केल्याने शहर पोलिसांनी त्यांच्यावरही संचाबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या प्रकाराने शहरात देखील खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे