आपल खान्देश

पाचोरा बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेच्यावतीने एन.टी.चे आरक्षण देण्यासाठी मागणी

पाचोरा (प्रतिनिधी ) पाचोरा बृहन महाराष्ट्र तेली समाज, महाराष्ट्र या राज्यस्तरीय सामाजिक संघटनेचे पाचोरा शहर कार्यकारिणी पदाधिकारी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून एन.टी.चे आरक्षण देण्यासाठी मागणीचे निवेदन पाचोरा नायाब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

पाचोरा बृहन महाराष्ट्र तेली समाज, महाराष्ट्र या राज्यस्तरीय सामाजिक संघटनेचे पाचोरा शहर कार्यकारिणी पदाधिकारी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून मा. मुखमंत्री सो, म.राज्य, मा. राज्यपालसो, मा. सामाजिक न्याय मंत्री यांना नम्र निवेदन सादर करतो की, तेली समाज हा सुरूवातीला भटक्या मध्ये मोडला जात होता. परंतु राजकीय लोकांनी या समाजाला ओबीसीमध्ये वर्ग केले. सद्यस्थितीत ओबीसीमध्ये ३४७ जातींचा समावेश आहे. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे. आणि म्हणून तेली समाजाला पुर्ववत एन.टी.चे आरक्षण देण्यात यावे. आमच्या तेली जातीचा समावेश ओबीसी प्रवर्गातून पहिल्या प्रमाणे एन.टी. प्रवर्गात करावा. कारण राज्यसरकारने आधीच्या ओबीसी प्रवर्गात पुन्हा वेगवेगळ्या अनेक जातींना समाविष्ट केल्याने आमच्या तेली समाजाचे पुरेशा प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळणे कठीण झाले आहे. आमच्या तेली समाजाचे निवेदन स्वीकारून आणि एन.टी. प्रवर्गात आरक्षण होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती असे निवेदनात दिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे