… काम केल्याशिवाय लोक निवडून देत नाहीत; एकनाथ खडसेंच्या गुलाबराव पाटलांना टोमणा.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली आहे. एका प्रचारसभेत गुलाबराव पाटलांनी खडसेंना डिवचले “विकास काय असतो हे ३० वर्षे आमदार राहिलेल्या नेत्याने माझ्या मतदारसंघात येऊन पहावे.”
गुलाबराव पाटलांना एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले “गुलाबराव पाटील यांना नाथाभाऊंनी तीस वर्षात काय केले हे माहिती आहे. नाथाभाऊने काय केले हे जिल्ह्यातील लोकांना माहीत आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीला लोक तीस वर्ष निवडून देतात ते त्याने केलेल्या कामांमुळेच. मला राजकारणात चाळीस वर्ष झाली आहेत. चाळीस वर्षात एकही निवडणूक हारलो नाही. जळगावच्या विकासकामामध्ये सर्वाधिक काम मी केली आहेत.”
गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर जोरदार टीका केली. तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना माझे चॅलेंज आहे. माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले.
याच्या उत्तरात खडसे म्हणालेत गुलाबराव पाटलांना हेमामालिनी का आठवली माहीत नाही. त्याच्या कुवती प्रमाणे ते बोलले असतील; मी त्याची फार दखल घेत नाही,


