ब्रेकिंग

रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीची ग्रामसभा झालीच नाही उपसरपंच सुनंदा बागुल यांची तक्रार


 नांदगाव ( प्रतिनिधी ) – मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील शेवटचे टोक असलेली रोहिले बुद्रुक येथील आज दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी बुधवारी सकाळी ठीक दहा वाजता होणारी ग्रामसभा झालीच नाही.

 शासनाच्या आदेशानुसार येथील ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार आणि ग्रामसेवक भगवान जाधव यांनी आज दिनांक 16 नोवेंबर 2021 रोजी बुधवारी होणारी ग्रामसभा यासाठी प्रसिद्ध केलेल्या नोटिशी प्रमाणे विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे यासाठी असलेले ग्रामसभेचे प्रोसिडिंग हजर करून पुढील ग्रामसभा घेण्यात यावी असे येथील ग्रामस्थांनी ग्रामसेवक भगवान जाधव यांना सांगितले असता यांनी सांगितले की ही ग्रामसभा विशेष ग्रामसभा म्हणून होणार आहे या ग्रामसभेत मतदार यादी शिवाय कोणत्याच विषयावर चर्चा होणार नाही. ज इतर कोणत्याही विषयावर चर्चा होणार नव्हती तर आपण तालुक्यात ग्रामसभेचे प्रसिद्ध केलेल्या नोटीस मध्ये विषय क्रमांक एक मध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे विषय क्रमांक दोन मध्ये आलेल्या जमा व खर्चास मंजुरी देणे बाबत विषय क्रमांक तीन जन्म, मृत्यू, विवाह यांच्या नोटीस मान्यता देणे, विषय क्रमांक चार आलेल्या

अर्जचे वाचन व त्यावर निर्णय घेणे, विषय क्रमांक पाच मध्ये आलेल्या परी पत्रकाप्रमाणे वाचन व त्यावर निर्णय घेणे, विषय क्रमांक सहा मध्ये मतदार यादीत नाव नोंदणी / दुरिस्ती / नाव वगळणे,कमी करण विषय क्रमांक सात मध्ये एनवेळी येणारे विषयावर चर्चा करणे बाबत इत्यादी विषय सरपंच व ग्रामसेवक यांनी काढलेल्या ग्रामसभेच्या प्रसिद्ध केलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. याप्रमाणे ग्रामसभा घेण्यात यावी असे येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनंदा बागुल व ग्रामस्थांनी मागणी केली. आणि मागील ग्रामसभेचे ग्रामपंचायतीचे प्रोसिडिंग नसल्याने व ग्रामसेवक भगवान जाधव त्यांच्याकडे 3 ते 4 ग्रामपंचायती असल्याने व मागील प्रोसिडिंग भरलेली नसल्याने रोहिले बुद्रुक येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण सूर्यवंशी यांच्याकडे उपलब्ध न झाल्याने येथील ग्रामसभा झालीच नाही.

 याबाबत ग्रामसेवक भगवान जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी बोलताना सांगितले की आजची ग्रामसभा जी विशेष ग्रामसभा आह या ग्रामसभेत मतदार यादी शिवाय कोणत्याच विषय नाहीत त्यामुळे ही ग्रामसभा आज घेण्यास हरकत नाही परंतु आज होणारी ग्रामसभा ही उद्या घेण्यात येईल असे सांगितले.

  सरपंच सखुबाई देविदास पवार यांना ठेवला असता त्यांनी सांगितले की आजची कल्याण सभा उद्या दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी बुधवारी सकाळी दहा वाजता घेण्यात येईल मागील ग्रामसभेची प्रोसिडिंग वाचून दाखविल्यानंतर पुढील विषयाला चर्चला सुरुवात करण्यात येईल असे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे