आपल खान्देश

भडगाव तालुक्यातील आमडदे येथे वीर जवान यांच्या हस्ते ध्वजारोहण

उपक्रमाचे सर्व दूर कौतुक होत आहे..

भडगाव (झूम मराठी) तालुक्यातील आमडदे येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांच्या संकल्पनेतून जवान(फौजी) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

भडगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांच्या संकल्पनेतून दर वर्षी आमडदे गावात महादेव मंदीराजवळ फौजी बांधवांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. देश रक्षणासाठी फौजी बांधव सिमेवर तैनात असतात, कर्तव्य बजावत असतांना घर, दार, परिवार, मित्र,आप्तेष्ट सर्व काही विसरून देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावत. अशा सैनिकांच्या हस्ते संभाजी भोसले मित्र परिवार दर वर्षी आमडदे गावात ध्वजारोहण करतात. या वर्षी-प्रमोद फौजी,सुरेश फौजी व सागर फौजी या जवानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात ध्वजारोहण करण्यात आले. संभाजी भोसले यांच्या या समाधान कारक उपक्रमाचे सर्व दूर कौतुक होत आहे. या ध्वजारोहण कार्यक्रमात सर्व गावकरी आनंदाने उत्साहात सहभागी झाले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे