आपल खान्देश
श्री गो से हायस्कूल पाचोरा येथील शिक्षक लसीकरण शोध मोहीम करताना
श्री गो से हायस्कूल पाचोरा येथील शिक्षक लसीकरण शोध मोहीम करताना
पाचोरा प्रतिनिधी सध्या पाचोरा नगरपालिका आरोग्य विभाग यांच्या आदेशानुसार लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची घरोघरी जाऊन नागरिकांची विचारपूस करून कोरोना लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे तसं सर्वे करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक एक मधील हनुमान वाडी नागसेन नगर थेपडे नगर आशीर्वाद ड्रीम सिटी रेणुका कॉलनी मिलिंद नगर प्रभाग क्रमांक एक मधील सर्व भाग व तेथील नागरिकांचा कोरोना लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची माहिती घेऊन जनजागृती करण्यात येत आहे यासाठी सकाळ दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी परिसर पिंजून काढला आहे बाकी असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम शिक्षक करत आहे यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील सर उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ पर्यवेक्षक एन आर पाटील आर एल पाटील ए बी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक बंधू-भगिनी काम पाहत आहेत यामुळे नागरिकांमध्ये रहिवाशांमध्ये जनजागृतीचे काम सुरू आहे लवकरात लवकर हा प्रभाग लसीकरण मुक्त होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत




