आपल खान्देश

पावणेचार कोटी रुपये खर्चून बुराई नदीवर होणार पूल!; आमदार रावल यांनी केले भूमिपूजन

मेंढपाळ बांधवांनी घोंगडी, काठी आणि फेटा बांधून आमदार रावल यांचा सत्कार केला

झूम मराठी न्यूज नेटवर्क 

साक्री (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुसाणे मंडळातील १९ गावे विकासापासून वंचित होती. या गावांचा शिंदखेडा मतदारसंघात समावेश झाल्यानंतर अनेक विकासकामे होत आहेत. बुराई नदीवर बंधारे बांधले. पर्यटन खात्याच्या माध्यमातून मोठा निधी या भागाला देण्याचे काम केले. बळसाणे ते आगरपाडा दरम्यान आता बुराई नदीवर पूल उभारण्यात येणार आहे. या कामावर ३ कोटी ८५ लाख रुपये खर्च होणार आहे, अशी माहिती शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी दिली.

बुराई नदीवरील पुलाचे भूमिपूजन आ. रावल यांच्याहस्ते नुकतेच झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, इंदवेचे माजी सरपंच दिनकर देवरे, कढरेचे सरपंच हिरामण कोळपे, बळसाणेचे सरपंच दरबारसिंग गिरासे, सतमानेचे सरपंच राजधर पाटील, लोणखेडीचे सरपंच रवींद्र गिरासे, रोहिदास महाले,व्ही. एम. देवरे, दामू पाटील, देवा ठेलारी, विकास राठोड, भोजराज धनुरे, नामदेव पाटील, देविदास धनुरे, शानाभाऊ पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सरदार पाटील, छावडीचे उपसरपंच निंबा धनुरे, उपअभियंता पवार आदी उपस्थित होते.

या वेळी आ. रावल म्हणाले, की १६५ कोटींतून सुकवद –बळसाणे- दुसाणे- विहीरगाव रस्ता होणार आहे. माळमाथा परिसरात रस्त्यांचे जाळे विणले आहे. रोहयोच्या माध्यमातून सुमारे १ हजार ४०० सिंचन विहिरी दुसाणे मंडळातील शेतकऱ्यांना दिल्या असून, येत्या काळात दुसाणे ते छावडी ते घाणेगाव ते हट्टी बु.ते सैताळे रस्ता, बळसाणे-कढरे ते लोणखेडी ते आयने मळखेड- इच्छापूर रस्ता, म्हसाळे-नागपूर- उभंड- टेंभे रस्ता होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मेंढपाळ बांधवांनी घोंगडी, काठी आणि फेटा बांधून आमदार रावल यांचा सत्कार केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे