ब्रेकिंग
रेल्वे अपघातात एका मृतदेहाची ओळख पाठवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन आवाहन
पाचोरा परधाडे येथे काल झालेल्या रेल्वे अपघातात एका मृतदेहाची ओळख पाठवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन आवाहन केले असून त्या मृत देहाचे खालील प्रमाने वर्णन करण्यात आले आहे.
काल झालेल्या रेल्वे अपघातात मृत झालेल्या एकाअनोळखी पुरुष वय अंदाजे 35 ते 40 वर्ष शरीराने -मजबूत ,गळ्यात काळ्या रंगाचा दोरा व त्यास हिरव्या रंगाचा तावित बांधलेला, दाढी -बारीक ,मिशी -बारीक, डोक्याचे केस -काळे व मोठे, अंगात फिकट सफेद रंगाचा त्यावर राखाडी व फिक्कट हिरव्या रंगाची चौकटीची डिझाईन असलेला फुलबाहीचा शर्ट तसेच निळ्या रंगाची फुल जीन्स पॅन्ट, कमरेस काळया रंगाचा बेल्ट अशा वर्णनाच्या अनोळखी इसमाची माहिती असून नागरिकांना सदर अनोळखी इसमाची ओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात यावे ही विनंती सदर मयत अनोळखी इसमाची ओळख पटल्यास पाचोरा पोलीसठाण्याला संपर्क करावा
- स्टेशन फोन नंबर 02596-240133
- पोलीस निरीक्षक अशोक पवार पाचोरा पोलीस स्टेशन मोबाईल नंबर 9823149808



