आपल खान्देश

नांदगाव शहरातील येवला रोड इतर भागातील नवीन रस्ता बनविण्याची मागणी

नांदगाव शहरातील येवला रोड इतर भागातील नवीन रस्ता बनविण्याची मागणी

नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- नांदगाव तालुक्यातील नांदगाव शहराच्या जुन्या रेल्वे गेट ते बेलदारवाडी पर्यंत येवला रोड व नांदगाव तालुक्यातील काही भागातील रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून त्यांची सुधारणा त्वरित हाती घेऊन नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी संतोष गुप्ता व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे.


या रस्त्याची मोठी चाळण झालेली असून मोठी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याने नागरिकांना व वाहनांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे यातूनच अपघातही घडत आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी येड्या बाभळी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने वाहनचालकांना पुढील रस्ता दिसेनासा झाला आहे. रस्त्याच्या कडेला गटार नसल्याने मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या बाजूला शिखर सासूला आहे नवीन रस्त्याची मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे.
यावेळी माहितीसाठी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे, तहसीलदार कार्यालय नांदगाव, पोलीस निरीक्षक नांदगाव यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आले . या निवेदनामध्ये संतोष गुप्ता सतीश अहिरे, ज्ञानेश्वर पवार, जहीर सौदागर, संतोष बंडगर ांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे