आपल खान्देश

पाचोऱ्यातील काकणबर्डी यात्रेला परवानगी द्यावी :कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी

पाचोऱ्यातील काकणबर्डी यात्रेला परवानगी द्या :कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी

पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा – भडगाव तालुक्यातील आस्थेचा विषय असलेल्या काकणबर्डी यात्रेला परवानगी देण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेस ने उपविभागीय अधिकारी यांना केली आहे.

शहरा जवळ असलेल्या काकणबर्डी येथे खंडोबा चे देवस्थान आहे याठिकाणी भाविक खुप येतात मागिल काळात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सदरची यात्रा रद्द करण्यात येत होती मात्र यंदाच्या वर्षी बर्‍याच प्रमाणात कोरोना चा अटकाव झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात यात्रा होत आहे त्याच अटी शर्थी वर काकणबर्डी ला यात्रेला परवानगी देण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, महीला जिल्हा उपाध्यक्षा कुसुम पाटील, सरचिटणीस संगिता नेवे, महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, आरोग्य सेवा सेल जिल्हा सरचिटणीस डॉ अनिरुद्ध सावळे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, प्रदिप चौधरी, युवक काँग्रेसचे प्रविण पाटील, संजय सोनार आदी उपस्थित होते. निवेदनात यात्रा ही भाविकांची श्रद्धा असुन या यात्रेवर अनेक लहान मोठे व्यापारी यांचे वर्षभराचे घराचे आर्थिक बजेट अवलंबून असतो अनेक रोजगार करणारे लोक काही महीन्या पासून स्वप्न बघत असतात त्यामुळे यात्रा महत्वाची असुन येणाऱ्या काळात सावखेडा, माहेजी देवी यासह यात्रा आहेत असे स्पष्ट देण्यात आले. यावेळी तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी शासकीय पातळीवर परवानगी देण्यात आम्हाला हरकत नाही मात्र संबंधित यात्रा कमिटी ने लेखी पत्र देऊन यात्रेला परवानगी देवु नये असे दिल्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे असे पोलीस निरीक्षक श्री. नजनपाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे