महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वसामान्य रिक्षावाल्याला केले उपनगराध्यक्ष !

झूम मराठी वृत्तसेवा

दौंड : दौंड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संजय गणपत चितारे  यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने  संधी देत चितारे यांना दौंड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष केले. राजकीय क्षेत्रात ज्या लोकांकडे पैसे आहेत, त्यांनाच पद मिळते असा समज आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य रिक्षावाल्यास उपनगराध्यक्ष करून हा समज खोडून काढला आहे, असे चितारे म्हणाले.

चितारे यांनी नगरसेवक म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्णत्वास नेला आहे. तरी पदाची हवा डोक्यात न गेल्याने त्यांनी पाच वर्षांत रिक्षा चालविणे बंद केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चितारे प्रभाग क्रमांक-१ मधून ते पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. नगरपालिकेतील काही समित्यांवर काम केल्यानंतर पक्षाने त्यांना शेवटच्या वर्षात उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या कार्यकाळात त्यांनी आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली . त्यांचे वडील रेल्वे खात्यातून मिस्त्री म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर संजय चितारे हे मागील २२ वर्षांपासून दौंड शहरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. चितारे यांना त्यांच्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करायचे आहे.

राष्ट्रवादीकडून उपनगराध्यक्षपदासाठी अनेक सदस्य इच्छुक असताना संजय चितारे यांची बिनविरोध वर्णी लावण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे व बादशहा शेख यांनी प्रयत्न केले, हे विशेष

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे