महाराष्ट्र-गुजरातला जोडणार धानोरा पूल कोसळला, पहा Video
नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र-गुजरातला जोडणारा धानोरा पूल कोसळला:पूल कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
नंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील धानोरा गावातील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. रंका नदीवरील असलेला पूल गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान कोसळला आहे. हा पूल मध्यभागी तडा पडून नदीत कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली घडलेली नाही
महाराष्ट्राच्या सीमेवरील नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमेलगत आहे. चाळीस ते पन्नास किमी अंतरावर गुजरात राज्याची सीमा हद्द असल्याने नंदुरबार येथून बहुतांशी नागरिक गुजरातला जाण्यासाठी राज्यमार्ग क्रमांक सहा असलेल्या नंदुरबार तालुक्यातील धानोरा मार्गे जात असतात, त्यामुळे या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. परंतु राज्य महामार्ग सहा वर असलेल्या धानोरा गावाजवळील रंका नदीवरील पूल गुरुवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान अचानक पूल ढासळला. हा पूल मध्यभागून कोसळून नदीत पडला आहे


