आपल खान्देशब्रेकिंग

रायगड जिल्हा परिषद दर्यागाव व असानेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना ह्युंमन इरा फॉउंडेशनच्यावतीने शालेय साहित्य वाटप.


सुधागड (राहुल महाडिक) रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील पाच्छापूर विभागातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दर्यागाव आणि असानेवाडी येथील विद्यार्थ्यांना ह्यूमन इरा फॉउंडेशन मार्फत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

ह्यूमन इरा फॉउंडेशन ही संस्था गेली दोन वर्ष सुधागड तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू लोकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करीत आहेत.आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मागील दोन वर्षांपासून ह्यूमन इरा फॉउंडेशन “Support child Education” या शिर्षकाखाली सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला होता.

गरजू मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रोत्साहन देण्यासाठी तसेंच पुढील काळामध्ये शिक्षणापासून कोणीही विद्यार्थी वंचित राहु नये यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे ह्यूमन इरा फॉउंडेशन चे डायरेक्टर झाईद कापडी यांनी सांगितले.   या कार्यक्रम प्रसंगी डायरेक्टर झाईद कापडी सर, झेया कापडी, मोहम्मद झिशान कापडी, सामाजिक कार्यकर्ते राहुल महाडिक, दर्यागाव शाळेचे मुख्याध्यापक धर्माजी खंडू तांडेल, उपशिक्षक राजु लहू बांगारे, असानेवाडी शाळेच्ये मुख्याध्यापक सुनीता देवराम काडले, उपशिक्षक प्रल्हाद गादेवर,तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे