आपल खान्देश
धुळे जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची सत्ता
झूम मराठी वृत्तसेवा
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (DDCC Bank) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने बँकेवर सत्ता राखली आहे. अध्यक्ष पद धुळ्यास तर उपाध्यक्षपद नंदुरबार जिल्ह्यास मिळाले. अध्यक्षपदी राजवर्धन कदमबांडे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. तर उपाध्यक्षपदी नंदुरबार जिल्ह्यातून दीपक पाटील यांचा विजय झाला आहे.

या झालेल्या निवडणुकीत संघर्ष पॅनलच्या वतीने (DDCC Bank) अध्यक्षपदासाठी शरद पाटील व उपाध्यक्ष पदासाठी आमशा पाडवी यांनी अर्ज दाखल केला होता. मतदारांनी मतदान केले. या मतदानात राजवर्धन कदमबांडे यांना 12 तर शरद पाटील यांना 5 मते मिळाली. तर उपाध्यक्षपदासाठी दीपक पाटील यांना 12 तर आमशा पाडवी यांना 5 मते मिळाली. त्यामुळे संघर्ष पॅनलच्या शरद पाटील व आमशा पाडवी यांचा पराभव झाला आहे. मतदारांनी पुन्हा एकदा राजवर्धन कदमबांडे यांच्या विश्वास दाखवल्याने त्यांचा विजय सोपा झाला आहे



