आपल खान्देश

राष्ट्रीय विमुक्त भटके मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या संयुक्त जयंती निमित्ताने भडगावात प्रबोधन पर कार्यक्रम उत्साहात


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

भडगाव (प्रतिनिधी) भडगाव शहरात राष्ट्रीय विमुक्त भटके मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने संत सेवालाल महाराज संत रविदास महाराज संत गाडगे महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने पंचायत समिती भडगाव येथे प्रबोधन पर कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.

भडगाव शहरात संत सेवालाल महाराज संत रविदास महाराज संत गाडगे महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने या कार्यक्रमात अनेक मान्यवर संत सेवालाल मंचावर विराजमान होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. एलजी कांबळे यांनी केले. तर मनोगत जोरसिंग राठोड, लता अहिरे, इंजि. सैंदाणे, रवी चव्हाण, नंदलाल आगारे, मुकेश नेतकर, धनराज चव्हाण, यांनी मनोगत व्यक्त केले तर पूर्णकालीन प्रचारक इंजी.निलेश चव्हाण यांनी अतिशय सोप्या पद्धतीने एक तास प्रबोधन केले. ईव्हीएमचा मुद्द्यावर प्रकाश टाकला व तीन मार्चला जामनेर येथे होणारी ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन रॅली संदर्भात सर्वांना येण्याचे आवाहन केले. आभार प्रताप खाडे यांनी मांडले. तर कार्यक्रम यशस्वी संपन्न होण्यासाठी सिताराम चव्हाण,हरी राठोड,रमेश चव्हाण, भिकन चव्हाण, करण चव्हाण, हेमंत पाटील, मुख्तार शेख, संदीप चव्हाण, दिनकर पाटील,संजय झुंजारराव, नाना सोनवणे यांनी मेहनत घेतली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे