आपल खान्देश

राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे केंद्र सरकारच्या विरोधात रॅली व जेलभरो आंदोलन पदाधिकाऱ्यांना अटक व सुटका

 राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे केंद्र सरकारच्या विरोधात रॅली व जेलभरो आंदोलन.

पाचोरा, (प्रतिनिधी) केंद्र सरकारने जाती आधारित जनगणना तसेच ओ. बी. सी. ची जातनिहाय जनगणना न करण्याचे ठरविले आहे त्याचे विरोधात, केंद्र सरकारने बनविलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विरोधात, खाजगी क्षेत्रांमध्ये आरक्षण लागू करण्यासाठी तसेच जुनी सेवानिवृत्त वेतन योजना लागु करण्यासाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओ.बी.सी.) मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे आज दि. २५ नोव्हेंबर रोजी शहरातुन रॅली काढण्यात आली. तसेच पोलिस स्टेशनला येऊन “जेलभरो” आंदोलन करण्यात आले. शहरातील आठवडे बाजार येथुन गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल होवुन “जेलभरो” आंदोलन करण्यात आले.

पाचोरा शहरातील आठवडे बाजार येथुन गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल होवुन “जेलभरो” आंदोलन करण्यात आले. या “राष्ट्रव्यापी चरणबध्द” रॅली व जेलभरो आंदोलनास शिवसेचे युवानेते सुमित किशोर पाटील यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या भव्य रॅली व “जेलभरो” आंदोलना प्रसंगी राष्ट्रीय ओ. बी. सी. मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, राष्ट्रीय किसान मोर्चा तालुका प्रभारी ननंदलाल आगारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजहर खान, नगरसेवक अशोक मोरे, वासुदेव महाजन, रफीक बागवान, बाबुराव सुतार, जाकीर खाटीक, हरिष आदिवाल, संजय महाले, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे, माजी नगरसेवक नसीर बागवान, सामाजिक कार्यकर्ते साजीद कुरेशी, भारत मुक्ती मोर्चाचे सचिन पैठणकर, मुख्तार शहा, अशोक महाजन, यांचेसह राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओ. बी. सी.) मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा सह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. जेलभरो आंदोलनकर्त्यांना कलम ६८ व ६९ नुसार अटक करुन – सुटका करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे