आपल खान्देश

बोलठाण ग्रामपंचायतीच्या स्मशान भूमीकर्मचारीचा टाहो, कायमस्वरूपी घेऊन पगार सुरु करावा मागणी


बोलठाण (प्रतिनिधी – मुक्ताराम बागुल) – नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील ग्रामपंचायतीच्या स्मशान भुमी मध्ये मृत ( मरण पावलेल्या ) व्यक्तीला अग्नि देण्याचे व सेवा करण्याचे कामासाठी ग्रामपंचायतीमार्फत शंकर कडमंचवर हे 25 ते 30 वर्षापासून काम करत असून कळमंचवर यांना बोलायचं ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी येऊन पगार देण्यात यावा अशी मागणी शंकर कड मंचवर यांनी बोलताना केली.

बोलठाण येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या स्मशानभूमी मध्ये शंकर कड मंच वर हे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून काम करत असून, ते चार ते पाच व्यक्तींच्या कुटुंबासह राहतात. ग्रामपंचायतीनेत्यांना राहण्यासाठी छोटीशी खोली बांधून दिलेली आहे. परंतु ती ही खोली पावसाळ्यामध्ये गळत असते त्यामुळे या कुटुंबाला कसेबसे रहावे लागते. या कुटुंबाला पावसाळ्यामध्ये खूप हाल सहन करावा लागतो तरीदेखील शंकर कड मंच वर हे त्रास सहन करून बोलठाण येथील मृत व्यक्तीची मनापासून सेवा करतात. तसेच येथील स्मशान भूमी मध्ये झाडे लावून झाडाला पाणी घालने, स्वच्छता ठेवणे व इतर कामे आवडीने करतात. परंतु प्रत्येक माणसाला जीवन जगण्यासाठी आर्थिक ( पैशाची ) गरज भासत असते.

त्यामुळे शंकर कड मंच वर हे सदर बोलठाण ग्रामपंचायत कार्यालय मध्ये मला आपल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी घेण्यात यावे आणि पगार देण्यात यावा अशी मागणी करण्यासाठी गेला असता येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे उडवाउडवीचे उत्तर देऊन ग्रामपंचायतीच्या बाहेर काढून दिले जाते तसेच येथील पदाधिकारी यांना याबाबत विचारण्यासाठी मागणी करण्यासाठी गेलो तर तेही मला ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर काढून देतात व तुला पगार दिला जाणार नाही व कायमस्वरूपी घेतले जाणार नाही. असे म्हणून या अगोदर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीने तुला काय दिले तर आता आम्ही तुला देणार नाही. तुला काय उपटायचे ते उपट अशी भाषा वापरून मला काढून दिले जाते तरी मी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागतो व माझ्यावर होणाऱ्या अन्याय संदर्भात बोलठाण ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास बसेल

वेळ पडली तर मी व माझे कुटुंब यांच्यासह आत्महत्या करील यास सदर बोल्थान ग्रामपंचायतीचे प्रशासक व पदाधिकारी जबाबदार राहतील अशीही माहिती शंकर कड मंचावर यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे