आपल खान्देश

जामनेर – एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी भिल समाजासाठी प्रमुख मागण्यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन

जामनेर – दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ वार मंगळवार रोजी एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती आज जळगांव जिह्यातील जळगांव जामनेर येथील विभागीय प्रांतकार्यालय जळगांव येथे. प्रांताधिकारी यांना एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी भिल समाजासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या प्रमुख मागण्यांसाठी आज निवेदन देण्यात आले. १) आदिवासी भिल समाजासाठी शासन जीआर नुसार आदिवासी भिल समाज राहात असलेल्या प्रत्येक गावामध्ये दफनभूमी उपलब्ध करुन आदिवासी भिल समाजदफनभूमी जागा असा उल्लेख करून ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यात यावे. २) आदिवासी भिल समाज राहत असलेल्या जागा नावे करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व ज्या लाभार्थ्यांचे नाव घरकुल यादीत असून त्यांच्या नाव जागा नाही अश्या लाभार्थ्यांना शासन जिआर नुसार जागा उपलब्ध करून देण्यात यावे. ३) आदिवासी भिल समाज कसत असलेल्या वन जमीन व गायरान जमिनीचा ७/१२ उताऱ्यावर नोंद करून मालकी हक्क मिळावा. ४) आदिवासी भिल समाजाला जातीचे प्रमाणपत्र व रेशनकार्ड राजस्व अभियान योजने अंतर्गत घरपोच देण्यात यावे. ५) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल याची उपशाखा जळगांव येथे सुरु करण्यात यावी. ६) शबरी वित्त विकास महामंडळा मार्फत सुशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण व महिलांसाठी विविध योजनांचा लाभ दोन ते तीन महिन्याच्या आतच देण्यात यावा. ७) शबरी घरकुल योजनेचा उदिष्ट वाढवून मिळावा असे निवेदन प्रांताधिकारी साहेब यांना देण्यात आले यावेळी निवेदन देतांना एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब जळगांव जिल्हाध्यक्ष (जळगांव लोकसभा) मा.संजुबाबा सोनवणे जळगांव जिल्हाध्यक्ष (रावेर लोकसभा) मा.निवृत्ती पवार युवा जिल्हाध्यक्ष मा.रविभाऊ सोनवणे अपंग सेल जिल्हाध्यक्ष मा.ऋषीदादा सोनवणे जिल्हा संपर्क प्रमुख रोहिदास जाधव जळगांव तालुकाध्यक्ष मा.मंगल सोनवणे जळगांव महिला आघाडी तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती सौ.मिराताई मोरे जळगांव तालुका उपाध्यक्ष तथा सरपंच विटनेर अरुण पवार जामनेर तालुकाध्यक्ष विलास मोरे तालुका उपाध्यक्ष दिपक सोनवणे पाचोरा तालुकाध्यक्ष गणेश वाघ एरंडोल तालुकाध्यक्ष वाल्मिक सोनवणे पारोळा तालुकाध्यक्ष गणेश गायकवाड धरणगांव तालुकाध्यक्ष संजय पवार जेष्ठ कार्यकर्ते भिवसनबाबा भिल युवा जिल्हा संघटक सुभाष मालचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष समाधान जाधव एरंडोल युवा तालुकाध्यक्ष जय मोरे एरंडोल तालुकाउपाध्यक्ष राहुल सोनवणे चाळीसगांव तालुकाध्यक्ष मोतीदादा पवार पारोळा पोलिस पाटील बबन नाईक भगवान सोनवणे व तसेच एकलव्य संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते चंद्रभान मोरे भानुदास गायकवाड किरण मोरे विनोद मोरे समाधान सोनवणे सुक्राम मोरे अशोक मोरे सचिन सोनवणे प्रविण पवार लक्ष्मण गणेश मोरे ह्यावेळी उपस्थित होते तसेच आज जळगांव जिल्हा बैठकी ही संपन्न झाली बैठकीत समाज हितासाठी नवनवीन विषयावर चर्चा करून जिल्हा कमिटी व तालुका कमिटी वर नवीन पद देण्यात आले जळगांव महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.मिराताई मोरे (माजी पंचायत समिती सभापती) यांनी निवड करण्यात आली त्यासोबतच युवा जिल्हा संघटक सुभाष मालचे जळगांव शहराध्यक्ष पदी राहुल ठाकरे यांची निवड एकमताने करण्यात आले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे